मनोज पाटलांना पोलीस उचलण्याची अफवा अन हजारो तरुण दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ नोव्हेबर २०२३

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मोठ्या चर्चेत आले होते त्यानंतर सरकारला त्यांनी ४० दिवसाचा वेळ दिल्यावर सरकारने निर्णय न घेतल्याने आता पुन्हा एकदा मनोज पाटील उपोषणाला बसून सात दिवस पूर्ण झाले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून जरांगे यांनी राज्य सरकारला शेवटच्या अल्टिमेटम दिला आहे. आज म्हणजेच बुधवारी सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा पाण्याचाही त्याग करणार असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना पोलीस उचलणार असल्याची अफवा मंगळवारी रात्री पसरली.

मराठवाड्यातील हजारो तरुण जालन्यातील अंतरावाली सराटी गावात दाखल झाले. यावेळी मराठा तरुणांनी जरांगे यांची विचारपूस करत परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटी गावात ठिकठिकाणी मराठा तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत होते.

परंतु, गावात शांतता होती. मंगळवारी सायंकाळी जालन्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यानंतर ही अफवा पसरली होती. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

मराठा आरक्षणाची मागणी पूर्णपणे मान्य होत नसल्याने काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील हे शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन समाजाला करीत आहेत. अशातच आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प झाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आता पोलीस उचलणार अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. तर काहींनी या गोष्टीची अफवा देखील पसरवली. ही अफवा कानावर पडताच मिळेल त्या वाहनाने हजारो मराठा तरुणांनी अंतरवाली सराटी गावात धाव घेतली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम