‘या’ चित्रपटात सचिनला मिळाले नव्हते मानधन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ ।  मराठी चित्रपटात एक नाव प्रामुख्याने नेहमी घेतले जात असते. ते म्हणजे सचिन पिळगावकर त्यांनी आपल्या अभिनयातून अनेक चित्रपटामधून चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. शोले चित्रपट आहे ज्यात या अभिनयाला मानधनच दिले नसल्याचे समोर आले आहे.

या सिनेमातील कलाकारांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. भूमिका छोटी असो किंवा मोठी प्रत्येकाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या सिनेमातील प्रत्येक भूमिका अजरामर झाली आहे. या सिनेमातील छोटा अहमद सर्वांना आठवतचं असेल. अहमदची भूमिका अभिनेते सचिन पिळगावकर यांनी साकारली होती. ही भूमिका आजही लोकांच्या मनात ठासून भरलेली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या भूमिकेसाठी सचिन पिळगावकर यांना मानधन दिलचं नव्हतं. हो हे खरं आहे पण याबदल्यात त्यांना एक अशी उपयोगी वस्तू दिली होती जी त्यांनी आजही जपून ठेवली आहे. अनेकदा याबद्दल सचिन पिळगावकर यांनी सांगितलं आहे. बॉलिवूडचा क्लासिक चित्रपट शोलेमध्येदेखील सचिन यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी अहमदची भूमिका साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मानधना ऐवजी फ्रिज देण्यात आला होता.

सचिन यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रविंद्र नाथ टागोर यांच्या नाटकावर आधारित ‘डाकघर’ या हिंदी चित्रपटात काम केले. त्यानंतर 1982 मध्ये सचिन यांनी ‘नदिया के पार’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातून सचिन खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. त्यानंतर सचिन यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये मूख्य भूमिका साकारली. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच सचिन यांनी टीव्ही मालिकांमध्ये ही काम केले. 2006 मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित झालेली मालिका ‘तू तोता मैं मैना’मध्ये काम केले. ही मालिका त्यावेळी सर्वात लोकप्रिय ठरली होती. ‘मायबाप’ या वडिलांनी निर्मिती केलेल्या चित्रपटातून सचिन यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण केले. सचिन यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये 20 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी बॉलिवूडमधील राजेश खान्नांपासून अमिताभ बच्चन यांच्यासह काम केले आहे. ‘बेस्ट चाइल्ट आर्टिस्ट’ म्हणून सचिन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘शोले’मध्येदेखील सचिन यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी अहमदची भूमिका साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मानधना ऐवजी फ्रिज देण्यात आला होता. सचिन यांच्यासाठी ती वस्तू खूप मोठी होती, आजही ते त्याबद्दल सांगताना दिसतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम