कृषिमंत्री सत्तारांची हकालपट्टी करा ; महाविकास आघाडीचे आंदोलन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ डिसेंबर २०२२ । राज्यातील राजकीय वातावरण आता कलाटणी घेत असतांना दिसून येत आहे. आज महाविकास आघाडीचे आमदार एकत्र येत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेत अनिल परब यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले. याप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश खुंटीला टांगून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचे एका व्यक्तीला वाटप केले. या जमिनीची किमंत साधरणतः दीडशे कोटी रुपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय अवैध पत्र 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही याप्रकरणी ताशेरे ओढलेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत अजित पवार आणि विधान परिषदेत अनिल परब यांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांचायविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… 50 खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या…अशा घोषणा यावेळी दिल्या. माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या , मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंधे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम