अभिनेत्री अमृता खानविलकरचा नवऱ्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  राज्यात अल्पावधीत फेमस झालेली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे विविध फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. फक्त मराठीतच नाही तर तिनं हिंदी मालिका व काही रिअॅलिटी शोमध्ये देखील ती सहभागी झाली आहे.

बॉलिवूडमध्ये देखील तिनं तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. अमृताचा नवरा मात्र या सगळ्यापासून लांबच असतो. तो देखील एक हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे पण सोशल मीडिया पासून काहीसा अंतर ठेवूनच असतो. आता या कपलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमृता व हिमांशू एकमेकांबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं बऱ्याचदा टाळतात. पण हिमांशूच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास व्हिडिओ शेअर केला आहे. अमृताने हिमांशूला खास सरप्राईज दिलं आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने हिमांशूच्या बर्थ पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत तिनं हिमांशूच्या जवळच्या व्यक्तींना बोलावलं होतं. हिमांशूलाही हे सरप्राईज खूपच आवडलं. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि तितकचं एकमेंकाविषयी प्रेम दिसत होतं.मृताने व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा दिवस खूप खास आहे.

तू आमच्या प्रत्येकासाठी खूप खास आहेस.”माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तसेच मला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. खरंच तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. अमृताने व्हिडीओ शेअर करत हिमांशूबाबत प्रेम व्यक्त केलं. शिवाय हिमांशूनेही खूश होत अमृताला किस केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम