अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना सुरक्षा, जागरुकता महत्त्वाची : प्रांतपाल
सायबर सुरक्षा विषयावर कार्यशाळा
दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर करतांना सोशल मिडिया असो की ऑनलाईन व्यवहार, माहिती देणे असो यावेळी प्रत्येकाने जागरुकता आणि सुरक्षा बाळगणे महत्त्वाची आहे, असे रोटरीचे प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला यांनी प्रतिपादन केले.
रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने रविवार, २६ फेबु्रवारी रोजी गणपतीनगरातील रोटरी सभागृहात झालेल्या सायबर सुरक्षा या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सहप्रांतपाल अरुण नंदर्षी, निर्वाचीत अध्यक्ष मनोज जोशी, मानद सचिव गिरीश कुलकर्णी, डिस्ट्रीक्ट डिजिटलायझेशन चेअरमन व रिजनल ट्रेनर डॉ.राहुल कुलकर्णी, समन्वयक अमोल पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० आणि विद्यापीठ यांच्यात झालेल्या संयुक्त कराराप्रमाणे ही पहिली कार्यशाळा होत असून या विषयात भरीव सहकार्यासह विद्यापीठ रोटरी साक्षरता मिशनमध्येही योगदान देईल, अशी ग्वाही कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी दिली.
कार्यशाळेत प्रा.आर.बी.आमले, सौ.के.टी.पाटील, समीर मानेकर, रजत शर्मा, अभिषेक छोरिया यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.राहुल कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. आभार अमोल पाटील यांनी मानले. कार्यशाळेस रोटरी डिस्ट्रीक्ट सेके्रटरी राजीव नाथाणी, माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, सहप्रांतपाल दिलीप गांधी, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, प्रेम कोगटा, किशोर मंडोरा, प्रा.पूनम मानुधने, डॉ.तुषार फिरके, कॅप्टन मोहन कुलकर्णी, संदीप शर्मा व सदस्य योगेश गांधी, प्रा.डॉ.शुभदा कुलकर्णी, उदय पोतदार, मकरंद डबीर, रितेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगावसह चाळीसगाव, फैजपूर येथील युवकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम