शब्दाला कुर्तीची जोड लागली पाहिजे अन्यथा सहित्यकांचे शब्द साहित्य, वांझ ठरेल … सुप्रसिद्ध साहत्यिक प्ररभाकर साळेगावकर.

बातमी शेअर करा...

(आबिद शेख) अमळनेर येथिल दोन दिवसीय
जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे भव्य उदघाटन संमारंभाने सुरवात झाली.’महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यप्रमाणे शब्दाला कृतीची जोड लागली पाहिजे अन्यथा साहित्यिकांचे शब्द,साहित्य वांझ ठरेल!’ असे आवाहन करीत ‘९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरच्या भूमितच होईल!’ असा विश्वास संमेलन उदघाटक सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर साळेगांवकर यांनी पू सानेगुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात उदघाटन सोहळ्यात व्यक्त केला.
संमेलन अध्यक्ष म सा प चे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी ‘साहित्य क्षेत्रातील अनेक कर्तृत्वाची शिखरं अमळनेर ने साहित्य विश्वाला दिलेली आहेत.पू सानेगुरुजी सारख्या अत्यंत संवेदनशील साहित्यिकाच्या नगरीत होत असलेल्या संमेलनाचे अध्यक्ष भूषविणे अभिमानास्पद आहे !’असे गौरवपूर्ण उदगार अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.’अमळनेरचा साहित्यिक- सांस्कृतिक वारसा समृद्ध असल्याने साहित्य संमेलनं यशस्वी होतात’ असे मत स्वागताध्यक्ष डॉ.प्रांजल पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना व्यक्त केले. साहित्याचा प्रवाह प्रवाहित करण्याची जबाबदारी सर्व साहित्यिकांवर आहे असे प्रतिपादन साहित्यिक मिलिंद बागुल यांनी केले. सुप्रसिद्ध लेखक वि दा पिंगळे यांनी यावेळी बोलतांना ‘पुण्यात विचार व्यक्त करणारे खूप आहेत मात्र अमळनेरला विचार ऐकणारे खूप आहेत! साहित्यिक संमेलनांना पुण्याच्या तुलनेत अमळनेरला साहित्य रसिकांची उपस्थिती कौतुकास्पद असते.याचे समाधान आहे असे सांगितले
अ भा मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी आपल्या भाषणात ‘आम्हाला कुणी विचारले की,तुम्ही सरस्वती,शारदा पाहिली आहे का? तर आम्ही सांगू ,हो! आम्ही सावित्रीबाई फुले,बहिणाबाई चौधरी यांना शारदेच्या रुपात पाहिले आहे.अमळनेरच्या साहित्यचळवळीचा वारसा लक्षात घेता अमळनेरला मराठी साहित्य संमेलन नक्कीच मिळेल!’ असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी सभा मंचावर म वा मंडळ अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,संमेलन संयोजक रमेश पवार,खा.उन्मेष पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शारदा पूजन करण्यात आले.
साहित्य संमेलन उदघाटन सोहळ्यात लेखक प्रा.डॉ.भरतसिंग परदेशी यांच्या “पाण्यारण्या,तृष्णेची शोधयात्रा” ,डॉ ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांचे निसर्गावली काव्यसंग्रह, रमेश पतंगे यांचे आपले संविधान, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी यांच्या अनुवादित ‘स्त्री समर्पित दिपशिखा का आलोक’, पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन संदिप घोरपडे, प्रा श्याम पवार यांनी केला.
ग्रंथ पूजन सोहळा तसेच वा.रा.सोनार ग्रंथ दालन उद्घाटनाने साहित्य संमेलनास सुरुवात झाली. सुप्रसिद्ध वास्तु विशारद चेतन सोनार यांच्या हस्ते ग्रंथ पूजन व वा रा सोनार ग्रंथ दालनाचे उदघाटन करण्यात आले.
पू सानेगुरुजी साहित्य नगरी परिसरात ग्रंथपूजनांनातर ग्रंथ दिंडी काढण्यात आली.यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी डॉ.अविनाश जोशी,कवी रमेश पवार,प्राचार्य डॉ पी आर शिरोडे,कवी शशिकांत हिंगोणेकर, पांडुरंग सुतार,Iप्रा डॉ प्र ज जोशी, भाऊसाहेब देशमुख, डॉ अपर्णा मुठे,खा शि मंडळ संचालक विनोद पाटील,विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे, प्रा डॉ एल ए पाटील,प्रा डॉ एस आर चौधरी, प्रा एस ओ माळी,डॉ.कुणाल पवार, बन्सीलाल भागवत,प्रा डॉ पी बी भराटे,सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, सिनेट सदस्य दिनेश नाईक,प्रा डॉ ए बी जैन, खा शि मंडळ उपाध्यक्षा सौ माधुरी पाटील, डॉ संदिप जोशी , गोकुळ बागुल,रणजित शिंदे,प्रा ज्ञानेश्वर कांबळे,आत्माराम चौधरी,धनंजय सोनार,गोपाळ हडपे आदि सहभागी झाले होते. परिसरात ठिकठिकाणी असलेल्या अप्रतिम रांगोळीने वातावरण उत्सवमय झालेले होते.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे भैय्यासाहेब मगर,प्रा डॉ रमेश माने, वसुंधरा लांडगे, रणजित शिंदे ,प्रदिप साळवी, प्रा शिला पाटील, स्नेहा एकतारे,नैना कुलकर्णी,प्रा डॉ लिलाधार पाटील, प्रा डॉ सौ.शैलजा माहेश्वरी,प्रा सौ प्रतिभा पाटील,सौ सविता देशमुख, श्रीमती रजनीताई केले,डी ए धनगर,उमेश काटे,दत्तात्रय सोनवणे, मनोहर नेरकर,राजेंद्र निकुंभ, विजय बोरसे, चिंधु वानखेडे,हेमंत बाळापुरे, जगदिश कुलकर्णी आदिंनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम