सलमानला पुन्हा धमकीचा फोन अन तारीख देखील दिली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ ।  गेल्या काही महिन्यांपासून देशातील नामवंत बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे फोन येत आहेत. आता पुन्हा एकदा सलमानला धमक्यांचे फोन आले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीनं यावेळी थेट मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षेत फोन केला होता.

सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीनं सलमानला 30 तारखेला मारणार असल्याचं देखील सांगितलं आहे. फोन करणारी व्यक्ती ही गौरक्षक जोधपूर राजस्थान येथील असून त्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख रॉकीभाई असी करून दिली आहे.

या फोनमुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सलमान खानला याआधी फोन आणि मेलवर धमक्या आल्या. गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोईचा या धमक्यांमागे हात असल्याचं म्हटलं जात आहे. मी केवळ धमक्या देत नाही तर त्या धमक्या मी लवकरच आमलात आणेल असं लॉरेंन्स बिश्नोईनं म्हटलं आहे. सलमान खानला सतत येणाऱ्या धमक्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 10 एप्रिलला सलमानचा किसीका भाई किसीकी जान हा सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या रात्रीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला सलमानच्या धमकीचा फोन आला आहे. याआधी 18 मार्चला सलमान खानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला धमकीचा ई-मेल आला होता.

ज्यात सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. रोहित गर्ग नावानं हा मेल आला होता. गोल्डू बरारला तुझ्या बॉसबरोबर बोलायचं आहे. त्याने इंटरव्ह्यू पाहिला असेल वाटतं. नसेल त्याला पाहायला सांग. मॅटर क्लोज करायचा आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर बोलणं करून दे. समोरासमोर बोलायचं असेल तर तसंही सांग. आधीच इन्फॉर्म केलं आहे. दुसऱ्या वेळेत थेट झटका मिळेल. सतत येणाऱ्या धमक्यांनंतर सलमान खाननं बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. या महागड्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमाननं खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार भारतीय बाजारपेठेतही लाँच झालेली नाही. आपल्या जिवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम