समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे नेते ८२ वर्षीय मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. यादव यांना युरिन इन्फेक्शन झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून ते उपचासाथी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांच्या पार्थिवावर मंगळवारी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये रुग्णालयात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं ८२ वर्षांचे असताना मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यान त्यांच निधन झालं आहे. मुलायमसिह यादव तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

मुलायम सिंह जमिनीशी जोडलेले नेते – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये लिहले की, मुलायम सिंह हे तळागाळातील नेते होते, जे लोकांच्या अडचणी समजून घेत होते. त्यांनी आपले जीवन लोकनायक जयप्रकाश आणि डॉ लोहिया यांच्या विचारांना वाहून घेतले. आणीबाणीच्या काळातील ते लोकशाहीचे महत्त्वाचे सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच्यासोबतचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम