समर्थ अँड प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भडगाव/प्रतिनिधी
शहरातील समर्थ अँड प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल येथे २६ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी शाळेत ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण, भारत माता पूजन तसेच विविध कार्यक्रमानी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन शशिकांत महाजन व सौ. मीना शशिकांत महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्राचार्य शर्मा उपप्राचार्य गढरी यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी विध्यार्थ्यांनि विविध महापुरुषाच्या वेशुभुशा साकारन्यात आल्या होत्या तसेच देशभक्ती पर गीत गायण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम