समर्थ अँड प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीयम स्कूल शाळेत समर्थोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सम्पन्न

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

समर्थ अँड प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीयम स्कूल शाळेत तीन दिवसीय समर्थोत्सव हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
समर्थोत्सव जल्लोष कार्यक्रचे उद्धाटन गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी संस्थेचे चेअरमन शशिकांत महाजन, संचालिका मीना महाजन, मुख्याध्यापक सी.एस. शर्मा, सैनिक श्रीराम महाजन, डॉ. अशोक ओस्तवाल, कवि अहिरे सर, आर्यन इन्फोटेक च्या संचालिका लीना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

समर्थोत्सव च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. धावणे, निम्बु चमचा, फुगे, बॉल विविध खेळ ची स्पर्धा घेण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी फूड & फन फेअर हा बालगोपाळांचा मेळावा पार पडला. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन, नाटक इ. सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने पार पडला. कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती मोठया प्रमाणात दिसून येत होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राकेश पाटील, माधुरी महाजन, जयश्री खैरनार यांनी तर आभार प्रा. किरण गढरी यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम