अजित पवारांवर संभाजीराजे छत्रपती आक्रमक म्हाणाले…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. भाजपा या विधानाचा निषेध करत आहे. अशातच आता छत्रपतींचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

संभाजीराजे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, “मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच म्हटलंय. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केलं, स्पष्ट करा. ऐतिहासिक संदर्भ, घटना बोलायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचं विधान चुकीचं. स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते हे चुकीचं आहे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम