सनातनला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही ; सरसंघचालक भागवत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० मार्च २०२३ ।  देशातील आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी हरिद्वारच्या भागवत ऋषीग्राममध्ये पोहोचले होते. या ठिकाणी त्यांनी पतंजली योग पीठातील संन्यास दीक्षा महोत्सवाला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचीही उपस्थिती होती.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भगवा देशाची शान असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, आज तुम्ही भगवा धारण करून देशाची शान वाढवण्याची प्रतिज्ञा घेत आहात. भगवा काळाच्या कसोटीवर उभा राहिलेला आहे. बाकी सर्व काही बदलत गेले. भगवा आधीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. आपल्या चारित्र्याने लोकांनी सनातन समजायला हवे, यासाठी सनातनला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

रामनवमीच्या दिवशी बाबा रामदेव आज व्हिआयपी घाटावर 100 तरुणांना संन्यास दीक्षा देणार आहेत. स्वामी रामदेव म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर महर्षी दयानंद, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्व क्रांतिकारकांचे पतंजली स्वप्न पूर्ण करत आहे. देश स्वतंत्र झाला, पण शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था आपली नाही. गुलामगिरीचे कर्मकांड आणि प्रतीके नष्ट करावी लागतील. हे काम फक्त संन्यासीच करू शकतील.

याआधी जानेवारी महिन्यात नागपुरातील ‘धर्मभास्कर’ पुरस्कार कार्यक्रमात त्यांनी आपण आपल्या धर्माला चिकटून राहावे, असे म्हटले होते. भले त्यासाठी आपल्याला प्राण गमवावे लागले. सनातन धर्म हे हिंदु राष्ट्र आहे. ज्यावेळी हिंदु राष्ट्राची उन्नती होते, ते देशासाठी असते, असे ते म्हणाले होते. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे त्याशिवाय जीवन चालू शकत नाही. ते म्हणाले होते की, अनुकूल परिस्थितीत सर्व काही ठीक होते, परंतु प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला संतांची आठवण येते. धर्म हे या देशाचे सार आहे. सनातन धर्म हे हिंदू राष्ट्र आहे. ज्यावेळी हिंदू राष्ट्राची प्रगती होते तेंव्हा फक्त त्या धर्माची प्रगती होते आणि आता सनातन धर्माचा उदय व्हावा हीच ईश्वराची इच्छा आहे. त्यामुळे भारताचा उदय निश्चित आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम