संगमनेरची सून झाली चीनची मुलगी !
दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ । देशातील अनेक तरुण जगभरात नोकरी करण्याच्या माध्यमातून जात असतात, जगभरातील अनेक ठिकाणी जेव्हा तरुण नोकरी करू लागत असतात याच वेळेत त्यांना त्याच देशातील तरुणीशी प्रेम होवून त्यांचे रुपांतर लग्नात होत असते. अशीच एक घटना राज्यातील तरूणासोबत घडली आहे व तरुणाने त्या तरुणीशी लग्न करून राज्यात देखील आणले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी येथील राहुल बाळासाहेब हांडे (वय 29) व शान छांग (वय 31) या चीनी तरुणीचा सोमवारी घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात भारतीय संस्कृती प्रमाणे विवाह झाला. हा आगळावेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.राहुल हांडे चीन येथे योग शिक्षण केंद्र चालवतो. योगाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबांकडून होकार मिळाल्याने ते विवाहबद्ध झाले. चीनची कन्या संगमनेर तालुक्याची सून झाल्याने या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.
एखाद्या चित्रपटात भारतातल्या मुलाने चीनी मुलीबरोबर लग्न केल्याचे पाहिले असेल. मात्र, हे रिअल लाईफमध्ये झाले असेल तर आणि त्यातल्या त्यात हा मुलगा महाराष्ट्रातला असेल तर? बहुदा जगावेगळ्या प्रेमाची ही काहानी ठरू शकते. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील 29 वर्षीय राहुल हांडे याने चक्क 31 वर्षीय शान छांग या चीनी तरुणीची चीनी परंपरेने लग्न करून तिला भारतात आणून भारतीय पध्दतीने सोमवारी घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात लग्न केले. भारतीय संस्कृतीप्रमाणे सात जन्माचे फेरे देखील घेतले. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती बघून शान छांग भारावून गेली. तर राहुल हा तिला सर्वांशी ओळख करून देत सर्व रूढी परंपरा समजावून सांगत होता. यामुळे आता चीन हा आपला शत्रू राष्ट्र जरी असला तरी या तरुणाने आपले प्रेमाचे संबंध प्रस्थापित करत लग्न गाठ बांधली
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम