विदर्भ साहित्य संघाच्या वतीने ‘सांज पाडवा’

उद्या सौ.गौरीताई थोरात यांचा ‘साक्षात जिजाऊ’ एकपात्री प्रयोग

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | खामगाव | चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे नववर्षाचा आरंभ, या नववर्षाच्या स्वागतासाठी यावर्षीही विदर्भ साहित्य संघ शाखा खामगावच्या वतीने उद्या सोमवार ८ एप्रिल रोजी ‘सांज पाडवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सौ.गौरीताई थोरात यांचा ‘साक्षात जिजाऊ’ हा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे.

स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब यांचा प्रेरणादायी इतिहास दर्शविणारा एकपात्री प्रयोग श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणार आहे.

या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.डॉ.विजय देशपांडे अध्यक्ष, रामदादा मोहिते उपाध्यक्ष, रघुनाथ खेर्डे सचिव, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे कार्यक्रम प्रमुख, शशांक कस्तुरे सहसचिव, प्रदिप अंजिनकर कोषाध्यक्ष यांनी केले आहे.

सौ. गौरी या संगणकशास्त्राच्या पदवीधर आहेत. तसेच रंगभूमीवरील त्या कलाकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत १६० हुन अधिक वेळा ‘साक्षात जिजाऊ’ या जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. लाठी काठी, तलवारबाजी व घोडेसवारी या ऐतिहासिक खेळांमध्ये त्या पारंगत आहेत. सन २०१९ सालात त्यांनी राज्य पातळीवरील महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

सन २०२१ सालात त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील मिसेस इंडिया हेरिटेज या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तर १३ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय मिसेस वर्ल्ड हेरिटेज’ या स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व करतांना गौरी अशोक थोरात यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण ३२ देशांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र व भारतातील ऐतिहासिक वास्तू, परंपरा, इतिहास या बाबींची आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी योग्य पद्धतीने यशस्वी मांडणी केली. काठी, तलवारबाजी व घोडेसवारी या ऐतिहासिक खेळांमध्ये त्या पारंगत आहेत. त्या मध्यप्रदेश सरकारचा मराठा भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक रमेश थोरात यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम