नोट बंदीवर संजय राऊत पंतप्रधान मोदींवर बरसले !
दै. बातमीदार । २० मे २०२३ । देशातील रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यावरून बीड दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या. सर्व ठीक होईल. त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास, माझी काही चूक निघल्यास मला भरचौकात फाशी द्या, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्याचा उल्लेख करताना संजय राऊत म्हणाले, नोटाबंदीचा कोणताही फायदा झालेला नाही. मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहीजे. पंतप्रधान मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेले पाहीजे.
बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: वधस्तभांकडे जात देशाचे मी किती नुकसान केले, याची माहिती दिली पाहीजे. नोटाबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, लहान उद्योग, व्यापार बंद पडले. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिली गोष्ट सांगितली होती की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे परदेशातील काळा पैसा देशात येईल. मात्र, गेल्या 6 वर्षांत एक तरी काळा पैसा देशात आला आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी केला. दरम्यान, आता 2000 रुपयांची नोट बाजारात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सूत्रांनुसार, काळ्या धनाच्या रूपात मोठ्या प्रमाणात नोटा जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम