संजय राऊतांची ‘शिवशक्ती पॉइंट’ नामकरणावर टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार| २७ ऑगस्ट २०२३ | भारताची महत्वाची मोहीम असलेल्या ‘चंद्रयान 3’ला मोठे यश मिळाले असून त्यासाठी पंतप्रधान यांनी नुकतेच काल इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेत कौतुक केले आहे. तर दुसरीकडे आज राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रयान 3 मोहिमेत विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला सर्वप्रथम जेथे स्पर्श केला, त्या जागेचे नामकरण शिवशक्ती पॉइंट असे करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूत इस्त्रो शास्त्रज्ञांची भेट घेतली तेव्हाच ही घोषणा केली. मात्र, या नामकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. विज्ञानावर कोणत्याही धर्माचे आक्रमण योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. नामकरणाशिवाय भारतीय जनता पक्ष अजून काय करू शकतो. शिवशक्ती पॉइंट या नावाला आमचा विरोध नाही. मात्र, भाजप प्रत्येक गोष्टीत हिंदूत्व घेऊन येतो. काही गोष्टी या विज्ञानाशीही संबंधित असतात, हे भाजपने जरा लक्षात घ्यायला पाहीजे, असा टोला संजय राऊतांनी लगावला. भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले हे भारताच्या वैज्ञानिकांचे यश आहे. चांद्रयानने जेथे तिरंगा फडकवला आहे, त्या जागेला खरे तर विक्रम साराभाईंचे नाव दिले पाहिजे होते. तसेच विक्रम साराभाई यांना भारतरत्नही दिले गेले पाहिजे. पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी केलेल्या कामामुळे चांद्रयान चंद्रावर गेले. हे पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई यांचे योगदान आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम