संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ सप्टेंबर २०२२ । पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात ईडी ने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात खासदार संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडी ने केला असून संजय राऊत सध्या याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबई शहरातील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचे ‘ईडी’ने या आरोपपत्रात नमूद केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती यांच्यासमोर सुनावणी पार पडली असून सोमवारी संजय राऊतांची पुढच्या रिमांड व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होईल. त्यामुळे राऊत यांना दीड महिन्यानंतर आता जामीन मिळतो का? हे आज कळेल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम