संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३

राज्यातील राजकारणात कधी काळी एकत्र सत्ता भोगत असलेले शिवसेना व भाजप आज मात्र एकमेकांचे चांगलेच वैरी झाल्याची स्थिती असून या दोन्ही पक्षातील नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतांना दिसून येतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन येथून महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. तीन वर्षांच्या करारावर ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहे. मात्र हा निवडणूक स्टंट असल्याचा घणाघात ‘दै. सामना’च्या आजच्या भवानी तलवार, बिचवा, वाघनखे, खंजीर; ‘खान’ कसा मारला?” या रोखठोक सदरामध्ये करण्यात आला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या भावनिक राजकारणारवर निशाणा साधला आहे. दरम्यान पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला हे सत्य आहे. हा दिग्विजय असल्याचे आम्ही मानतो. इतिहासाला कलाटणी देणारे ते अचाट असे साहस छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवले.

संजय राऊत् पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक हत्यारांचा वापर केला. भवानी तलवार, अफझलखानाला मारले ती वाघ नखे आणि लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या तलवारीचा आपण उल्लेख करतो. पण आमचे सरकार कधीपासून इतिहास संशोधक झाले आहे? स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना वाघनखांबाबत संशय आहे आणि तुम्ही संग्रहालयातील वाघनखे घेऊन ती शिवाजी महाराजांची असल्याचे दाखवताय. ही फसवणूक आहे. त्याला कोणताही आधार नाही, पुरावा नाही. अर्थात ती शिवकालीन असू शकतात, आम्हाला त्याबद्दल आदर आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. पण इतिहास त्यांनी वाचला पाहिजे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम