संजू बाबा शोधत आहे आमिषासाठी मुलगा ; आमिषा म्हणाली…

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ | बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट काही दिवसापुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ‘गदर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. तरी सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

गदर-2’च्या यशानंतर अमिषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जिथे एकीकडे हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. तर दुसरीकडे, अमिषा मीडिया मुलाखतींमध्ये अनेक खुलासे करत आहे. नेहमीच अमिषा तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अमिषाने एक मोठं वक्तव्य केलं आहे. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
सध्या अभेनेत्री अमिषा पटेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. अमीषा पटेल सध्या बॉलिवूडचे बडे स्टार्स आमिर खान, सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबद्दल सतत काही ना काही वक्तव्य करत आहे. अमिषाच्या मते, तिन्ही स्टार्सचे गुण आणि काम करण्याची शैली वेगवेगळी आहे. एका मुलाखतीत अमीषाने सांगितलं की, आमिर खान हा अतिशय व्यावसायिक, मेहनती आणि खोल व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती आहे. सलमानबद्दल बोलताना अमीषा म्हणाली की, तो माझा खोडकर मित्र आहे.

संजय दत्त माझ्यासाठी खूप स्पेशल आहे- अमिषा
संजय दत्तबद्दल बोलताना अमिषा पटेल म्हणाली की, तो तिच्या लग्नासाठी सतत प्रयत्न करत असतो. अमिषा म्हणाली, ‘संजय 20 वर्षांपासून माझ्यासाठी चांगला मुलगा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. संजू हे माझं कुटुंब आहे. मी तुझं लग्न करून देतो, असे तो अनेकदा म्हणतो. 20 वर्षांपासून ते हे सांगत आहेत. तो माझ्या खूप स्पेशल आहे, तो असंही म्हणली की, तुझं लग्न झाल्यावर मी कन्यादान करेन.अमीषाने आमिर खानसोबत ‘मंगल पांडे: द रायझिंग’ (2005), सलमान खानसोबत ‘ये है जलवा’ आणि संजय दत्तसोबत ‘तथास्तु’ आणि ‘चतुर सिंग टू स्टार’मध्ये काम केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम