
संत मुक्ताई समाधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंतर्फे महावस्त्र
संत मुक्ताई समाधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंतर्फे महावस्त्र
मुक्ताईनगर : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत अत्युच्च स्थान असलेल्या संतांची लाडकी बहीण, आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली अपार श्रद्धा व्यक्त करत, संत मुक्ताई यांना महावख व पूजा साहित्य अर्पण केले.
यांच्यावतीने हे महावस्त्र व पूजेसाठी आवश्यक साहित्य शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्त करण्यात आले. मुक्ताई यांच्या तेजोविलीन दिनानिमित्त
दि. २२ गुरुवारी आयोजित समाधी महोत्सवात हे महावख व पूजावस्तू अर्पण करण्यात येणार असून, यातून राज्य शासन व शिवसेनेच्या वतीने मुक्ताई मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संत मुक्ताई केवळ नामजप करणारी संत नव्हे, तर त्या ज्ञान, भक्ती आणि कर्तृत्व यांचे त्रिवेणी संगम होत्या. त्यांच्या स्मरणानेच वारकरी भाविकांचे मन शुद्ध होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले महावख हे एक प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कृतज्ञतेचे प्रतिक मानले जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम