सारा अली खान OTTवर स्वातंत्र्यसैनिक; वरुण धवनने वेगळ्या पद्धतीने केली घोषणा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०५ ऑक्टोबर २०२२ । बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरुणने सांगितले की, सारा अली खानचा चित्रपट ए वतन मेरे वतन लवकरच ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. वरुणने साराच्या शैलीत ही माहिती दिली आहे. हा चित्रपट १९४२ मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक काल्पनिक कथा आहे.

ज्यामध्ये सारा अली खान एका शूर, सिंह-हृदयाच्या स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारणार आहे. वरुण या व्हिडिओमध्ये साराची नक्कल करत तिच्या शैलीत म्हणतो, ‘नमस्ते प्रेक्षक, ही ‘ए वतन मेरे वतन’ ची घोषणा आहे. हाच व्हिडिओ सारा अली खाननेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आता या घोषणेनंतर चाहते खूप खूश आहेत. रिपोर्ट्सनुसार, सारा या चित्रपटात उषा मेहताच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेकदा ग्लॅमरस भूमिका साकारणारी सारा पहिल्यांदाच एवढी गंभीर भूमिका करताना दिसणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम