आडगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 3 नोव्हेंबर २०२२ |भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती चोपडा तालुक्यातील आडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचे उदघाटन माजी सैनिक मनोज पाटील तसेच देशसेवेत कार्यरत असलेले जवान विनायक पाटील, अमोल पाटील, स्वप्नील पाटील, जयेश पाटील, विलास पाटील, शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. अखंडतेची शपथ घेण्यात आली. तसेच गावात रॅली काढून घोषणा देण्यात आल्या. सरदार बल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे योद्धे, दूरदर्शी राजकारणी, समाजसेवक होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनतेला भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेण्याची प्रेरणा दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार समाजासाठी, युवकांसाठी, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार या देशातील नेत्यांना तसेच प्रत्येक नागरिकाला माहित असणे आवश्यक आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुजर लॉयन गृप आडगाव च्या नवयुवकांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम