
सत्तारांची पुन्हा ठाकरेंवर टीका म्हणाले रश्मी वहिनीना मुख्यमंत्री करा..
दै. बातमीदार । २६ नोव्हेबर २०२२ । शिवसेनेत फुट पडली आणि दोन गट स्थापन झाले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी यांच्यावरतीही आरोप प्रत्यारोप करण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले की, किमान त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी समोर ठेवला होता. मुख्यमंत्री पदी असताना अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले दिसले होते. मी मंत्री असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार अशा शब्दात सत्तार यांनी टीका केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम