सत्यजीत तांबेंच्या वक्तव्याने राज्यभर रंगली चर्चा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मार्च २०२३ । राज्यातील पदवीधर मतदार संघातून निवडूण आलेले व काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, त्यांच एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. “माझा यशाचा एकच बाप आहे,” असं विधान तांबे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयात पदवीधर शिक्षकांची भेट घेतली.

अनेक लोकं येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे.हे मी सभागृहातही मांडलं. इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स’. यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं. तसेच, बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे,” असं सूचक वक्तव्यही सत्यजीत तांबेंनी केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम