
सावरकरांचे नातू करणार गांधी विरोधात पोलिसात तक्रार
दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात एक विधान केले आहे. त्याविरोधात सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधीवर सावरकांवर विधान केल्याबद्दल टीका केली आहे. सावरकरांविरोधात बोलणाऱ्या राहुल यांच्यासोबत आदित्य फिरतात कसे, असा सवालही केला आहे.
सत्ता बदलल्यामुळे आरोप
राहुल गांधींच्या या वक्तव्याचा सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध आणि निषेध केला आहे. ते म्हणाले, हिंदुत्ववादी शक्तींकडे सत्ता आली. साधारण वाजपेयी सरकार आल्यानंतर या भूमिकेला सुरुवात झाली की, सावरकरांनी माफी मागितली. सावरकरांनी असे केले. तोपर्यंत कोणी काही म्हणत नव्हते. तर ही एक प्रतिक्रिया होती. त्यानंतर पुन्हा दहा वर्ष यांचे सरकार नव्हते. तेव्हा हे आरोप बंद झाले. चौदा साली हे सरकार जेव्हा आले. तेव्हा हे आरोप सुरू झाले. तेव्हा हा सत्तेचा खेळ आहे. सत्तेच्या खेळात तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय, हे तुम्हाला लक्षात येत नाही.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम