
सावदा येथे आमदार एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सावदा येथे आमदार एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सावदा (प्रतिनिधी) – विधान परिषद सदस्य आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याचा सावदा येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांना निवेदन देत या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकाराच्या व्हिडिओच्या अनुषंगाने आमदार खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी टीका करत अत्यंत खालच्या पातळीचे आरोप केल्याचे आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केले आहेत. या प्रकाराचा विपरित अर्थ लावत जाणूनबुजून मंत्री महाजन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा भाजपचा आरोप आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “राज्याच्या विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य म्हणून आ. खडसे यांच्याकडून अशा प्रकारची भाषा वर्तवली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी केलेले वक्तव्य सार्वजनिक जीवनातील शिष्टाचाराला बाधक आहे.”
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सावदा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, शिवसेना शहराध्यक्ष सुरज परदेशी, भाजपा सरचिटणीस संतोष परदेशी, माजी नगरसेवक शाम आकोले, तसेच महेश आकोले, सागर चौधरी, गुणवंत वायकोळे, मनीष भंगाळे, गणेश माळी, वेडू लोखंडे हे उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम