
आयुक्त भगाओ…जळगाव बचाओ ; प्रहारने दिला अजब नारा !
दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ । शहर मनपातील प्रशासनाविरोधात भाजपचे नगरसेवकांनी आंदोलन सुरु केले असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रहार जनशक्ती पार्टीचे महानगराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जळगाव मनपातील आयुक्त यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले कि, जळगांव शहरांत गेल्या 5 ते 6 वर्षापासुन समस्यांचा महापुर असतांना प्रशासनाच्या नाकरते पणामुळे जळगांवकरांना खडयांच्या मोठया प्रमाणात समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे. निधी येवुन देखील पारदर्शकपणे रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरीकांना आहे त्याच परिस्थीतीत मृत्युचा सापळा झालेल्या जळगांवच्या रस्त्यावर जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्रशासक म्हणुन आयुक्त म्हणुन सबसेल फेल ठरलेल्या महापालिका आयुक्तांच्या तात्काल हकालपट्टी करावी अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात येत आहे. जळगांव शहर नागरीकांच्या समस्येवर फुंकर घालण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने एक स्वाक्षरी प्रहारची जळगांव करांच्या न्याय हक्काची…….! जळगांव शहर महापालिकेवर प्रशासक म्हणुन श्री. तुकाराम मुंडे साहेब यांची नियुक्ती करावी. हा उपक्रम दि.३१ जुलै २०२३ रोजी वार-सोमवार सकाळी 10.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन कोर्ट चौकात राबवत असुन त्याव्दारे राबवुन प्रशासन तसेच लोकप्रति निधी यांचे लक्षवेधनेसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. अन्यायग्रस्त नागरीकांनी या मोहीमेस सहभागी व्हावे असे आव्हान प्रहार जन्नशक्तीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
नागरीकांकडुन मालमत्ता कर वसुल करण्यात येतो मात्र त्या तुम्ही सुविधा मात्र शुन्य मिळतात. अनेक राजकीय पक्षात सत्ता बघुन देखील जळगांवला पाहीजो तो दिलासा मिळालेला नाही. अनेक आश्वासने देवुन वर्षानुवर्ष सत्तेत राहणाऱ्या पक्षांनी देखील जळगांवकरांच्या समस्येकडे तोंड फिरविले आहे. जळगांव महापालिका प्रशासनातील सर्वेसर्वा असलेल्या आयुक्तांनी पाहीजे त्या प्रमाणात दखल घेतलेली नाही. आयुक्तांनी कायदेशिर लढा देवुन पुन्हा नियुक्ती मिळवली मात्र जळगांव करांच्या समस्या सोडविण्यात आयुक्त अपयशी झाले आहे. लोकप्रतिनिधी या सोबतच प्रशासनातील अधिकाऱ्यांकडुन जळगांवकरांच्या अपेक्षा कोणत्या आहे. म्हणुनच महापालिका प्रशासक म्हणुन तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम