प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीयम स्कुल येथे विज्ञान प्रदर्शन सम्पन्न

बातमी शेअर करा...

भडगांव/प्रतिनिधी
     येथील समर्थ & प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीयम स्कुल भडगांव शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध असे उत्कृष्ट विज्ञान प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

     यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. शशिकांत लक्ष्मण महाजन तर मीना शशिकांत महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर शिवलाल शर्मा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास सुरुवात केली.सदरील प्रदर्शनास सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. किरण बी. गढरी, श्री. राकेश एस. पाटील, सौ. कविता सी.मालपुरे, सौ. माधुरी बी. महाजन या शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. यावेळी ५४ विद्यार्थ्यांनी विविध असे विज्ञान प्रयोग सादर केलेत. पालकांनी देखील या कार्यक्रमास उपस्तिती देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम