दगडफेक कुणी केली हे पहावे लागेल ; मुख्यमंत्री शिंदे !
बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | राज्यातील मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे आले असतांना यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले. महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यामध्ये दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? लाखा-लाखांचे मोर्चे निघाले. 58 मूक मोर्चे निघाले होते. लोक याला विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरु आहे. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावे लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत का याची माहिती येत आहे, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मी 3 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठीक नाही. आपण चर्चा करू, असे मी त्यांना सांगितले होते. पण तरीही त्यांनी उपोषण केले, असे सांगतानाच आंदोलकांवर लाठीमार झाल्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम