सीमा हैदरने चौकशी नंतर सर्व सांगितले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ ।  देशात सध्या एका प्रेमीयुगुलाची मोठी चर्चा सुरु आहे. या स्टोरीला अनेकानी ‘गदर’ चित्रपटाची आठवण देखील करून दिली आहे. पण पोलीस यंत्रणा ज्या प्रकारे तपास करीत आहे. त्याप्रमाणे हि स्टोरी कुठलीही लव्ह स्टोरी असल्याचे कुठलेही संकेत देत नाही. हि स्टोरी सीमा हैदर भारत आली कशी व का आली यासाठी एटीएसने तिची चौकशी केली असून सीमासोबत तिचा पती सचिन आणि सासरे नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या चौकशीमध्ये सीमाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कारण काही तशी कारणे त्यातील सर्वात मुख्य म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिचं वय हे 21 दाखवण्यात आलं होतं मात्र तिने वय 27 सांगितलं होतं. त्यामुळ ती गुप्तहेर असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. परंतू तिने चौकशीनंतर सर्व काही स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.

सीमा हैदर काय म्हणाली ?
पाकिस्तानमधून येण्यासाठी मी माझं घर विकून पैसे जमवले होते. त्यानंतर यू ट्यूब भारतात कसं जाता येईल याची माहिती घेतली. पाकिस्तानमधून मी शारजाहला गेले तिथून नेपाळ आणि ग्रेटर नोएडा असा प्रवसा केला. आता मी पाकिस्तानला जाऊ शकत नाही. कारण तिथे गेले तर माझ्या जिवाला धोका आहे. माझा भाऊ मजूरीचं काम करत होता आणि गेल्या वर्षी तो सैन्याकत भरती झाला असून तो साधा हवालदार आहे. इतकं सर्व काही सांगूनही जर मला देशाचा कायदे जे काही करायला सांगेल ते करायला मी तयार असल्याचं सीमा हैदरने सांगितलं आहे. दरम्यान, आता मी आधी हिंदू आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये परत पाठवलं तर माझ्या जिवाला धोका आहे. मी माझ्या प्रेमासाठी भारतात आले असून सचिनवर माझं प्रेम आहे. जर मी दोषी आढळले तर मला हवी ती शिक्षा करा मला ती मान्य असेल. सरकार मला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवू शकतं, मी पण तिथे राहायला तयार आहे पण मुलांना आणि सचिनलासुद्धा तिथे ठेवावं, असं सीमा हैदर म्हणाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम