मुस्तुफा खानची जळगांव जिल्हा कॅरम संघात निवड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ ।  जळगाव शहरातील कांताई साभगृह येथेदिनांक २५ व २६ जुलै दरम्यान जळगांव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित जिल्हा स्तरीय सिताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंती निमित्त जळगांव जिल्हा मानाकंन व निवड कॅरम स्पर्धेत नॅशनल कॅरम क्लब नशिराबादचा खेळाडू मुस्तूफा खान यांने जळगांव जिल्हयात ६वे स्थान प्राप्त केले. पुणे येथे दिनांक ०४ ते ०७ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता त्याची जळगांव जिल्हा पुरुष संघात निवड करण्यात आली आहे.

त्याच्या निवडीबद्दल नॅशनल कॅरम क्लब तर्फे सर्वश्री मोहम्मद फजल मन्यार, समद मेंबर, अजिज मोमिन, समद आयडिया,नवाब खान,समिर अली, अजमल खान ( राजु भाई ) रियाज अली ( भुरा भाई) अताऊल्लाह खान, मुज्जमिल मन्यार, सिद्दिक शेख, जमीर खान, मुनसफ अली, अहमद पठाण, मुजिबुद्दिन, वसीम अहमद,अकील अ.रहेमान, एजाज अ.रहेमान,गणेश माळी, आदी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम