स्व. बापूजी फौंडेशन तर्फे भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा होणार साजरा

बातमी शेअर करा...

भडगाव- प्रतिनिधी

      सालाबादप्रमाणे स्व. बापूजी फौंडेशन तर्फ महान आदर्श जाणता राजा, युगपुरुष व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून गेल्या आठवड्ापासून शहरातील शिवाजी महाराज चौक येथे नियोजन करण्यात येत आहे.

     त्यानुसार दि.१९ रोजी सायंकाळी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शिवपूजन, व आकर्षक देखावा, अस्टगंध ढोल ताशा पथक, नागाई लाईट शो, बँड, डी. जे. फटक्यांची आतिषबाजी आदी कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज की जय हा आवाज सर्व परिसरात गुंजणार आहे.
      तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोठा मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी शिवप्रेमींनी दिवसभर शिवपूजन, रात्रीपर्यंत शिवप्रेमींनी या ठिकाणी शिवपूजनसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

      शिवजन्मोत्सवाच्या दिवशी भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचे पूजन व महाआरती आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्वांनी या भव्य दिव्य शिव जन्मोस्तव कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा असे आवाहन आयोजक स्व. बापूजी फाउंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम