पोलिसांचा खळबळजनक दावा : ठाकरेंवर हल्ला झालाच नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ फेब्रुवारी २०२३ । औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. यादरम्यान काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच, भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे असले प्रकार करत असतील. असही यावेळी दानवे म्हणाले.

राज्यातील ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नाही. असा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. औरंगाबादमधील कार्यक्रमादरम्यान रमाई यांची मिरवणूक थांबवल्यामुळे राडा झाला.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता मोठा खुलासा झाला आहे.

पोलीस काय म्हणाले ?
काल आदित्य ठाकरे यांची सभा मालगाव या ठिकाणी होती. त्या ठिकाणी त्यांचा ताफा तिथून निघत असताना गोंधळजन्य परिस्थिती होती. एक कॅमेरामन होते ते किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु जो दावा करण्यात आला आहे. तो दावा खोटा आहे. इथे कोणतीही दगडफेक झालेली नाही. कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडलेला नाही. सभेदरम्यानदेखील दगडफेक झालेला नाही. सभा सुरळीतपणे पार पडली. सभा झाल्यानंतर दोघेही सुखरुप बाहेर पडले. प्राथमिक चौकशीनुसार एकही दगड गाडीवर फेकण्यात आलेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम