शाहरुख खानचा अपघात ; किंग खान झाला रक्तबंबाळ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका शूटसाठी शाहरुख खान गेलेले असतांना या ठिकाणी त्यांचा मोठा अपघात झाला असल्याची माहितीसमोर आली आहे. यानंतर त्यांच्यावर तिथे शस्त्रक्रियाही करावी लागली. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर त्याचे किरकोळ ऑपरेशन करावे लागले.

 

अभिनेता शाहरुख खानचा लॉस एंजेलिसमधील एका प्रोजेक्टच्या सेटवर अपघात झाला. मंगळवारी आलेल्या एका नवीन अहवालानुसार, अपघातानंतर शाहरुखवर अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली. रिपोर्टनुसार शाहरुखच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसली होती. शाहरुख खान आता भारतात परतला आहे आणि घरबसल्या रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत शाहरुख किंवा त्याच्या टीमने या अपघाताबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम