पाकिस्तानी अभिनेत्री सोबत शाहरुखचा मुलगा करतोय डेट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जानेवारी २०२३ । देशात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे मोठे वादंग उठले होते. त्याच्या या चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत असतानाच दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेहीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीमुळे चर्चेत होता. तर आता पुन्हा एक आर्यन खान चर्चेचा विषय ठरला आहे. आता आर्यन एका पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानला डेट करतोय ही बातमी समोर आली आहे. त्यावर आता सादियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर आर्यनचे सादियासोबत नवीन वर्ष साजरा करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना वाटले की आर्यन सादियाला डेट करत आहे. त्यानंतर त्या दोघांच्या जोडीची सर्वत्र चर्चा सुरु झाली. दुबईत आर्यन आणि सादियानं एकत्र नवीन वर्षाचे स्वागत केले. या चर्चा पाहता सादियानं स्पष्टिकरण दिलं आहे. सादिया म्हणाली की असं काही नाही. ते दोघे रिलेशनशिपमध्ये नाहीत, मात्र तिचा या गोष्टीचं आश्चर्य आहे की एका फोटोमुळे अशा चर्चा आगीसारख्या पसरु लागल्या.

UAE पब्लिकेशन सिटी टाईम्सनुसार, संपूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय लोक माझ्या आणि आर्यनबद्दल असे कसं बोलत आहेत हे खूप विचित्र आहे. फक्त एक फोटो पाहून लोक हे कसे बोलतात. अशा अफवा पसरवायला लोकांना काही लागत कसं नाही, या सगळ्यावर मर्यादा असायल्या हव्यात, असं सादिया म्हणाली. आर्यन आणि तिची कशी भेट झाली याविषयी बोलताना पुढे सादिया म्हणाली, आमची भेट नवीन वर्षाचे स्वागत करताना झाली होती. फोटो काढण्याआधी आम्ही थोडा वेळ गप्पा मारत होतो, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. आर्यनसोबत फोटो क्लिक करणारी फक्त मी एकटीच नव्हते तर आर्यनसोबत फोटो काढून शेअर करणारे बरेच लोक होते. तर आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत या सगळं सत्य नसून फक्त अफवा आहेत. आर्यन खूप चांगली व्यक्ती आहे. त्याच्याविषयी अशा अफवा पसरवू नका. सादिया खान ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. गेल्या 11 वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सादियानं छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सादिया ‘खुदा और मोहब्बत’ या मालिकेमुळे प्रकाश झोतात आली होती. यानंतर सादिया ‘खुदा और मोहब्बत 2’, ‘शायद’, ‘मार्यम पेरिरा’ आणि ‘अब्दुल्ला द फायनल विटनेस’ यामध्ये दिसली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम