शाईफेक प्रकरण भोवणार : १४ जणांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील भाजप मंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल दि १० रोजी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. तर यासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत होता. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्याला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल झाल आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण केले होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कोणी शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकल्यानंतर हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम