
शक्ती फाऊंडेशनतर्फे निराधार व गरजू महिलांना मोफत पिंक ऑटो प्रशिक्षणचे उदघाटन
महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्याकरिता आयोजन
शक्ती फाऊंडेशनतर्फे निराधार व गरजू महिलांना मोफत पिंक ऑटो प्रशिक्षणचे उदघाटन
महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्याकरिता आयोजन
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद नगर येथील शक्ती फाऊंडेशन संपर्क कार्यालय येथे सौ.भारतीताई रंधे व ऍड. अभिजीत रंधे यांच्या संकल्पनेतून निराधार व गरजू महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्याकरिता महिलांना मोफत पिंक ऑटो रिक्षा चे प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन झाले.
शिबिराच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जळगांव शहराचे आ. सुरेश भोळे (राजुमामा), शिवसेना जिल्हाप्रमुख मा. विष्णूभाऊ भंगाळे, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ.सरिताताई माळी-कोल्हे, डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयु. आशिषभाऊ सपकाळे,योगा प्रशिक्षक सौ.नेहाताई तळेले, ब्युटी पार्लर प्रशिक्षक सौ. प्रियांका ताई नारखेडे , मा.अशोकजी म्हस्के,सौ. कोमलतंय वाडे तसेच शिवसेना पदाधिकारी सौ. निषाताई पवार,डॉ.सुषमा चौधरी,पुष्पाताई तळेले,ममता जनजाळे, उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. बचाव पक्ष सरकारी वकील व संस्थेचे अध्यक्ष ऍड.अभिजीत रंधे यांनी केले तसेच सौ. भारतीताई रंधे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व कोमलताई वाडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश सोनावणे, सौ.प्रियांका रंधे,मोहित सावडेकर, लताताई ढोबळे,सुमन ताई भालेराव, उज्वलाताई शेजवळ,बेबीनंदा म्हस्के,आयु.संगीताताई मोरे, आयु. निलूताई इंगळे. रंजनाताई सपकाळे या सर्व महिलांना प्रशिक्षण देणार आहे.
====================

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम