
शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल; तीन दिवस दौरे रद्द !
दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ । राज्यात शिंदे सरकारचा महाविकास आघाडीतर्फे आता आंदोलन करीत विविध मुद्यावर निषेधाचे आंदोलन सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक पत्र काढून ही माहिती देण्यात आली. पुढचे तीन दिवस पवारांवर उपचार होणार असल्याचे समजते.
काय म्हटले पत्रात?
राष्ट्रवादी काँग्रेसने एक पत्र काढून शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम