शरद पवारांनी दिला मंत्री मुंडे यांना जबर धक्का !

बातमी शेअर करा...

बातमीदार |  १७ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार हे राज्य दौऱ्यावर असतांना आज त्यांची जाहीर सभा बीड येथे होत असून सभेपूर्वीच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. मुंडे यांचे समर्थक बबन गित्ते यांनी मुंडेंची साथ सोडून शरद पवारांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंडे यांना मोठा झटका बसला आहे.

शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा होणार आहे. हा जिल्हा राष्ट्रवादीचे नेते तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला आहे. पण धनंजय मुंडे यांच्या बंडखोरीमुळे येथील शरद पवार गटाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना चेकमेट देण्यासाठी पवार त्यांच्या मतदार संघातून त्यांच्याविरोधात शड्डू ठोकणार आहेत.

शरद पवार यांच्या सभेत परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक बबन गित्ते राष्ट्रवादीच्या पवार गटात प्रवेश करणार आहेत. बबन गित्ते बीडचे एक वजनदार नेते आहेत. ते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पण त्यानंतरही त्यांनी मुंडेंची साथ सोडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बबन गित्ते यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना पर्याय शोधल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडे यांनी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) काही नेतेही आज शरद पवारांच्या गटात येणार आहेत. यात शिवराज बांगर यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम