शरद पवारांनी राऊतांना फटकारले ; आमच्या घरातील…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ मे २०२३ । राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले महाविकास आघाडीत गेल्या आठवड्यापासून एकमेकाच्या विरोधात कुरघोडी करीत असल्याचे राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात राजीनामा माघारी घेतल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून राष्ट्रवादीचे वाभाडे काढले होते. त्यावर आता शरद पवार यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

लोकांनी मला थांबू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाही. पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे, अशा शब्दात शरद पवार यांनी राऊत यांना उत्तर दिलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम