वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार !
बातमीदार | १२ ऑक्टोबर २०२३
देशभरातील सर्व विरोधी पक्ष मिळून गेल्या काही महिन्याआधी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. त्यात राज्यातील वंचित बहुजन आघाडीला सहभागी केले नसल्याचे दिसून आले होते. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत घेण्याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच आतापर्यंत प्रकाश आंबेडक यांना इंडिया आघाडीत का घेतलं नाही?, यावर देखील पवारांनी भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मात्र समान कार्यक्रमावर भाजपविरोधातील ज्या शक्ती एकत्र येऊ शकतील. यामध्ये यापूर्वी काय झालं याचा विचार न करता त्यांना सहभागी करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. बाकीच्या लोकांना देखील विश्वासात घ्यावे लागेल, असे पवार म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी उशीर का होतोय, यावर शरद पवार म्हणाले, आमची बैठक झाली नाही. इंडियाची बैठक होणार आहे. मुंबईला बैठक झाली त्यानंतर नागपूर किंवा इतर कुठं बैठक होणार, याबाबत आमची चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर आरोप करतात पण ते आमच्यासाठी नवीन नाही. त्यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडी निर्णय घेईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम