महाविकास आघाडी लढविण्याबाबत शरद पवारांचे वक्तव्य ; राजकीय चर्चेला सुरुवात !
दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ । गेल्या काही दिवसापासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चर्चेत आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी थेट महाविकास आघाडीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू शकते.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. एकिकडे गेल्या काही दिवसांपासून विरोधा पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात नविन सत्ता स्थापन करणार चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी ही चर्चा फटकारली आहे. मात्र, चर्चा अद्याप सुरु आहे. इतकचं नव्हे तर अदानी ग्रुपची पाठराखण केल्यानंतर शरद पवार एनडीएत सहभागी होणार अशा चर्चेने जोर धरला होता.
दरम्यान, अमरावतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांना 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. 2024 च्या निवडणुका मविआ एकत्र लढेल का? तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत येईल का? असा सवाल पवार यांनी उपस्थित करण्यात आला. ”वंचित आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यातीद जागांविषयी. दुसरी कसलीही नाही. असं सांगत स्पष्टीकरण दिलं. तसेच, आम्ही एकत्र लढणार वगैरे आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांच वाटप, त्यामध्ये काही इश्यू. हे अजून केलंच नाही. तर कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? असं मोठं विधान पवार यांनी केलं आहे.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम