सरत्या वर्षाला निरोप देताना शरद पवार यांचे वक्तव्य !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । 2022 वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर तर 2023 च्या उंबरठ्यावर आपण आहोत. अशात सरत्या वर्षाने आपल्याला काय दिलं आणि येत्या वर्षात काय करायचं याची गोळाबेरीज करण्याचा हा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव वर्षाचं स्वागत करताना तुमच्या आमच्याप्रमाणे राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा आहेत, यावर बोलले आहेत.

आजची तारीख 31 डिसेंबर. बरंच काही सांगून जाते… मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या… जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली… आता आपण यातून मुक्त झालो, असं शरद पवार म्हणालेत.

आता 2023 वर्ष सुरु होईल.. 1 तारीख उद्याच आहे. अवघा भारत देश औत्सुक्याने नव्या वर्षाची पाहतोय. येतं वर्ष नव्या आशा-आकांक्षांचं असेल, असं शरद पवार म्हणालेत. 56 ते 60 टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारं वर्ष चांगलं जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणं हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणतं. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात, असं पवार म्हणालेत.सुदैवाने मागील वर्ष ठीक गेलं.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असलं तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावं लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरं जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचं स्वागत करूयात, असं शरद पवार म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम