मणिपूरच्या घटनेनंतर शरद पवारांचे ट्वीट !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जुलै २०२३ ।  देशातील मणिपूरमध्ये गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून जातीय दंगलीनंतर आता आणखी एक माणुसकीला काळीमा फसणारी आणणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचं आता समोर आलं आहे. एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य लिहिलं आहे. “माणुसकीशिवाय तुझा गौरव व्यर्थ आहे,” हे बाबासाहेबांचं वाक्य शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

‘मणिपूरमधील विदारक दृश्यामुळे मन दुखावलं आहे. महिलांवरील अत्याचाराचं हे विदारक दृश्य घृणास्पद असल्याचं पवार म्हणालेत. तर हीच वेळ आहे संघटित होण्याची, एकत्र येण्याची, आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागण्याची. मणिपूरमध्‍ये शांतता प्रस्थापित करण्‍यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागाने तातडीने आवश्‍यक कारवाई करणे आवश्‍यक आहे, असंही शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम