शत्रुघ्न सिन्हानी केला मोठा खुलासा : पत्नीसोबत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । बॉलीवूडमध्ये जर कुणी काही खुलासा केला तर सध्या ते काही वावगे ठरत नाही पण गेल्या शतकातील असे अनेक कलाकार आहेत जे कधीच त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याचा खुलासा केला नाही. पण सध्या ते कलाकार खुलासा करू लागले आहे. अशातच शत्रुघ्न सिन्हा हे अरबाज खान याच्या ‘द इनव्हिन्सिबल’ शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यामधील अनेक किस्से सांगितले आहेत.
इतकेच नाही तर त्यांनी पत्नी पूनम हिच्यासोबत पहिली भेट कशी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाली हे देखील सांगितले. शोमध्ये त्यांनी चित्रपटातील अनेक मजेशीर किस्से देखील सांगितले आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी अर्थात बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लवकरच अक्षय कुमार याच्यासोबत एका बिग बजेटच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे. सोनाक्षी सिन्हा हिने यापूर्वी अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अरबाज खान याच्या शोमध्ये बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आयुष्यामध्ये केलेल्या चुकांबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी मान्य केले की, आपण पत्नी पूनम सिन्हा हिला धोका दिला आणि तिच्यापासून वेगळे होण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना त्यांची चूक काही दिवसांनंतर लक्षात आली.
विशेष म्हणजे पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे पहिल्या भेटीच्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर लग्न झाले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मला माहिती नव्हते की, माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी अभिनेता होईल. पुढे काय होणार याची कल्पना मला मुळीच नव्हती किंवा मी त्याचा विचार केला नव्हता. आम्ही बोलणे बंद केले आणि तो माझा निर्णय होता. विशेष म्हणजे हे त्यावेळी झाले होते, ज्यावेळी माझ्या आयुष्यात खूप काही घडत होते…मी त्याबद्दल काही बोलणार नाहीये….कारण ती माझी चूक होती. मी फक्त पूनम आणि माझ्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारणे शोधत होतो आणि नात्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होतो.
मी एक दिवस पूनम हिला म्हणालो की, तू माझ्यासाठी खूप चांगली आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मुळात ही पूर्णपणे माझी चूक होती, मी फक्त स्टारडममध्ये अडकलो होतो. मला अगोदर वाटत होते की, कोणतीही महिला माझ्यामध्ये रस घेणार नाही. मात्र, काही दिवसांमध्ये संपूर्ण परिस्थिती बदलत गेली आणि मी माझे नियंत्रण गमावले. मी तिला एक प्रकारचा घटस्फोट दिला. इतकेच नाहीतर मी तिच्यासोबतचे सर्व संपर्क देखील तोडले. मला काही दिवसांनी कळाले की, पूनम मला शोधत आहे. इतकेच नाहीतर मी तिच्यासोबत असलेल्या नात्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती माझ्या कर्मचाऱ्यांना माझी काळजी घेण्याचे सांगत होती, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या या मोठ्या खुलाशाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम