तिने सोडले नोकरीवर पाणी आणि गेली ‘भारत जोडो’ यात्रेत…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२  केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालेय.राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जात आहे.

देशभर राहुल गांधींनी भारत जोडोच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरुवात केली आहे, यात सोशल मीडियावर राहुल गांधींयांच्या व्हिडीओ फोटो सर्वत्र शेअर होत असताना त्यांच्या या साध्या राहणीमानाकडे तरुणाई आकर्षित झाली आहे, दरम्यान याच भारत जोडो पदयात्रेला नाशिक रोडच्या अतिषा पैठणकरच्या निमित्ताने नाशिकचा हात मिळाला आहे.
याचदरम्यान,भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील एका तरुणीची सर्वत्र चर्चा होत आहे. आतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव आहे.ही तरुणी नाशिक रोड येथील रहिवाशी आहे. या तरुणीची कथा ही वेगळीच आहे. तिला तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियात नोकरी मिळाली. यानंतर ७ सप्टेंबरला तिच्या नोकरीची होती. मात्र, याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती.

नोकरीवर रुजू होण्यासाठी ती ६ सप्टेंबरला कोलकाता येथे जायला निघाली होती. मात्र, मुंबई विमानतळावर आल्यावर तिला नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत ती द्विधा मन:स्थितीत होती. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडले आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही तिला करावा लागला.मात्र, एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. यानंतर आई वडिलांनी दिलेल्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले. नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्वकांक्षी आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे, असे आतिषा पैठणकर म्हणाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम