शिना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या मुलीचा अर्ज फेटाळला ; आईसोबत राहण्याचा अर्ज नामंजूर

बातमी शेअर करा...

मुंबई : इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीने आपल्या आईसोबत राहण्याची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) विशेष न्यायालयात दाखल केलेला अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला.

 

आईला (इंद्राणी) २०१५ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा आपण अल्पवयीन होतो. मात्र, आईला अटक झाल्यापासून आपण आईची साथ, प्रेम आणि जिव्हाळा यापासून वंचित आहोत. मागील सात वर्षांमध्ये माझ्या भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. आईपासून लांब राहणे कठीण जात आहे म्हणूनच तिला आईसोबत मुक्तपणे संवाद साधता आणि जगण्याची विनंती, अर्जातून केली होती.

आपण आईची साथ, प्रेम आणि जिव्हाळा यापासून वंचित आहोत, स्वतःच्या आईसोबत राहणे, आजारी आईची काळजी घेणे हा कोणत्याही मुलांचा मूलभूत अधिकार आहे, असे याचिकेत म्हटले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, याचिकेवर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, सीबीआयने विधीच्या याचिकेला विरोध केला त्याची दखल घेत न्यायालयाने विधीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता विधीला आई (इंद्राणी)सोबत राहता येणार नाही.

 

सीबीआय तपासावर प्रश्नचिन्ह

शिना बोरा हत्याकांड प्रकऱणात सीबीआयच्या तपासावर इंद्राणी मुखर्जीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, इंद्राणीच्यवतीने बाजू मांडण्यात आली. तेव्हा, इंद्राणीच्या आवाजाचे (ऑडिओ व्हॉईस) सॅम्पल प्रक्रियेत सीबीआयकडून मोठी तांत्रिक चूक झाली आहे. खार पोलिसांच्या ताब्यातील ऑडिओ सीडी सीबीआयने मॅचिंग न करता वापरला असल्याचा आरोपही इंद्राणीच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच इंद्राणीच्या कागदपत्रांही सीबीआयने छेडछड केली आहे. इंद्राणीच्या ओव्हर सीज इंटर्नशनल कार्डला (ओसीआय) छिद्र पाडले आणि पुरावा म्हणून सादर केले. ओसीआय हे बायोमेट्रिक नोंद असलेले कार्ड असून कार्डला छिद्र पडल्याने ते निकामी झालं. त्यामुळे पुराव म्हणून जप्त केलेल्या वस्तूंना सांभाळून ठेवण्यात आले नाहीत. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण ? असा सवालही इंद्राणीच्यावतीने उपस्थित करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम