शीतल म्हात्रे प्रकरण : आ.सुर्वे शांत का ? संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मार्च २०२३ । राज्यातील राजकारण इतक्या खालच्या थराला येऊन पोहचले आहे कि, त्याला कुठेही मर्यादा नसल्याचे दिसून येत आहे. एकमेकावर टीका करीत असतानाही सत्ताधारी असो कि विरोधी कुणीही विचार करून टिपणी करत नसल्याचे सातत्याने समोर येत असतानाचा शिंदे गटाचे आमदार व महिला नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्धही सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते दिल्ली पत्रकारांशी बोलत होते.

“शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अनेक तरुणांना अटक केली जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. हा काद्याचा गैरवापर आहे. मी दिल्लीत असल्याने ते प्रकरण नेमंक काय आहे, हे मला माहिती नाही. पण जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी तपासलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांची काही तक्रार आहे का? हे तपासणं गरजेचं आहे. कारण सर्व प्रकरणात त्यांचीही बदनामी झाली आहे. बदनामी ही फक्त महिलांचीच होते, असं नाही. पण हे घडत असताना ते नेमके कुठं आहेत? ते शांत का आहेत?”, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम