
शेळावे माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा
पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील माध्यमिक विद्यालय शेळावे बु. येथे शिक्षकदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी व मुख्याद्यापक म्हणून १० वीतील विद्यार्थी चेतन पाटील होता. तसेच सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील व अश्विनी पाटील यांनी केले शाळेतील विद्यार्थीनी शिक्षक म्हणून भूमिका आज रोजी पार पडली.
विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे शिक्षकांचे अध्यापन करून त्यांनी आपला सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक आर पी पाटील सर यांनी मनोगत पर विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले आणि सर्व मुलांचा सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याविषयी विचार व माहिती सांगितली आणि शिक्षकाविषयी सुंदर असे विचार मांडले.
या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक एस. एस. पाटील, मनोज पारधी, एस. व्ही. सरोदे मॅडम, आर. बी. सोनवणे मॅडम, सायली देसले मॅडम, डी. एच.पाटील, हेमंत पाटील, कैलास पाटील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम