युती मजबूत करण्यासाठी शिंदे – भाजपचा मोठा निर्णय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जून २०२३ ।  राज्यात दोन दिवसापासून शिंदे व भाजपच्या गटात मोठा वाद सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात जरी सुरु असली तरी पहिल्या जाहिरातीनंतर दुसरी जाहिरात चूक न करता शिंदे सरकारने प्रसिद्ध केली असून आता शिंदे व भाजप युती टिकविण्यासाठी मोठा निर्णय देखील घेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठी माहिती दिली आहे.

शंभुराज देसाई पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी माहिती दिली. विषय संपवू आणि २०२४ च्या कामाला लागू. सामंज्यासाच्या भूमिकेतून पुढे जाऊ. पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठांची समन्वय समिती करु. अस यावेळी शंभुराज देसाई यांनी सांगितलं.
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन शिंदे गट आणि भाजप आमदार खासदार यांच्यात वाद सुरु आहे. अशातच ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो झळकले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात आलं होतं. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, असंही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम